Site icon ज्ञानसंवाद

जि.प.शाळा कर्दळ येथील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तू पासून बनवला ब्लुटूथ स्पीकर

#शास्त्रज्ञ
#शोध_नाविन्याचा,कर्दळ शाळेचे अवलिया शास्त्रज्ञ

जि.प.शाळा कर्दळ ,केंद्र -सफाळे ,ता/जि :-पालघर
येथील इयत्ता ७वी च्या वर्गातील विशाल दिवे आणि हर्षद राजापकर ही कर्दळ डोंगरी पाड्यावर राहणारी मध्यम वर्गातील दोन अवलिया विद्यार्थी आहेत.लॉकडाउन च्या काळात यांनी अनेक छोटे छोटे यशस्वी विज्ञान प्रयोग केले आहे.परंतु काही दिवसांपूर्वीच या दोघांनी मिळून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू पासून एक दर्जेदार buetooth dj बनविला आहे.शाळेतील शिक्षकांना व शाळेत येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यास या dj चा प्रयोग दाखविताना त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या शोध लावल्याचे स्मितहास्य बघण्यास मिळाले. तसेच हा प्रयोग पाहताना सर्वजण चकितच झाले आहे.

         हर्षद व विशाल या दोन्ही मुलांनी लॉक डाउन काळात परिसरातील अनेक टाकाऊ वस्तू पासून काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतात.अशावेळी एका व्यक्तीच्या घरी कचऱ्यात टाकलेला खराब buetooth device घरी आणला.त्याच्या वायर चेक करून त्यांच्या पद्धतीने तो चालू केला.परंतु ,त्याला लागणारे स्पीकर त्यांच्याकडे नव्हते.अशावेळी शाळेतील शिक्षकांच्या मदतीने शाळेतील खराब झालेले 4 वर्षांपासून बंद असलेले स्पीकर त्यानाही कोणतीही फिटिंग वस्तू उपलब्ध नसताना वायरिंग चा जुगाड करत यांनी हे स्पीकरही चालू करून ब्लूटूथ device ला जोडले आणि ब्लूटूथ चालू झाला आणि हा प्रयोग जि प शाळा कर्दळ येथील शिक्षक व विद्यार्थ्या समोर केला.यावेळी त्यांच्या आनंदाला पूर आला होता. यानंतर शाळेतील पुठ्ठा बॉक्स घेऊन त्याला दोन्ही स्पीकर इतमाणे जॉईन केले.आणि शाळेत आलेल्या कुंदा संखे मॅडम,केंद्रप्रमुखा सफाळे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.छाया विजय ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन केले व मॅडम ने विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.

✍️ श्री.राजन गौतम गरुड,प्राथमिक शिक्षक(मार्गदर्शक)
मार्गदर्शक :- सौ छाया ठाकूर मॅडम,श्री.कल्पेश पाटील सर व आरती संखे मॅडम

Exit mobile version