वृत्तसेवा,औरंगाबाद:- येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किरतपूर येथील शिक्षिका मीरा टेके यांना राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ वैजापूरच्या नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांनी मकर संक्रांती निमित्त हळदीकुंकू कार्यक्रमास फाटा देवून विधवा महिलांना सन्मान देण्यासाठी ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ या उपक्रमाचे आयोजन शिक्षक संघ महिला आघाडी वैजापूर यांच्या सहकार्याने केले होते. त्यांच्या या उपक्रमास मातृसेवा फाउंडेशन ठाणे, स्माईल टीम यवतमाळ आणि शिक्षकांचे मासिक ‘शिक्षक ध्येय’ महाराष्ट्र यांच्या मार्फत हा पुरस्कार देण्यात आला. राज्यातील महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतर सर्व नागरिकांना व्हावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे असून राज्यातील सर्व ,४६ विजेत्या महिलांना घरपोच पाठविण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण प्रसंगी वैजापूरच्या नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, शिक्षक संघ वैजापूरचे अध्यक्ष नारायण साळुंखे, संजय गायकवाड, संजय कांबळे हे उपस्थित होते.
त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.