Site icon ज्ञानसंवाद

१० वी १२ प्रश्नपेढी संदर्भात शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची महत्वाची माहिती

कोरोना पार्श्वभूमीवर विविध राज्यातील शिक्षण खाते प्राप्त परिस्तिथी नुसार निर्णय घेत आहेत.काही राज्यात परीक्षा रद्द बाबत चर्चा होत आहे.या सर्व घडामोडीत महाराष्ट्रात ही शिक्षण विभागाने अभ्यासक्रम कपात व परीक्षा ऑफलाईन होईल असे जाहीर करत संभ्रम दूर केले आहे.
कपात केलेला अभ्यासक्रम व या स्थितीत १०,१२ च्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार? याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर तज्ञ शिक्षकांच्या साह्याने SCERT ने विषयनिहाय प्रश्नपेढया निर्माण केल्या आहेत.व विद्यार्थ्यांच्या अधिकाधिक सरावासाठी त्या संकेतस्थळावर अपलोड करणे सुरू केले आहे.
या संदर्भात शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी ट्विटर द्वारे माहिती कळविली आहे.

 



 

यासाठी राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद यांच्या

https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi

 या संकेतस्थळावरून इयत्ता व विषयनिहाय प्रश्नपेढया डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना सरावासाठी देण्यात येतील.

कोरोना संदर्भात आरोग्य विभागाद्वारे सूचित मार्गदर्शक सूचनांचे पालन करत दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे च्या दरम्यान होणार आहे तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणार आहे.

 

Exit mobile version