जागतिक महिला दिनानिमित्त अनोखी राज्यस्तरीय स्पर्धा
मुंबई, महाराष्ट्र : मातृसेवा फाउंडेशन, ठाणे; स्माईल टीम, यवतमाळ; साप्ताहिक/मासिक शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई येथील श्रीनिवास बागरका कनिष्ठ महाविद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान, जे.बी. नगर, अंधेरी पूर्व येथील इंग्रजी भाषा शिक्षिका, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, ब्लॉगर आणि स्टोरीमिररवरील नामांकित कवयित्री सौ. प्रेमजीत सुनील गतीगंते 8 मार्च रोजी यांना ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
त्यांनी Let’s Explore English with Premjit Gatigante या विषयावर उपक्रम सादर केला होता. त्यांचा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे.
महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे, त्यांच्या उपक्रमाची माहिती राज्यातील सर्वांना व्हावी हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर राज्यात प्रथमच असा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
राज्यातील १०७ महिलांनी या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला असून ४६ महिलांना या ठिकाणी ‘कर्तृत्ववान महिला’ म्हणून पुरस्कार देण्यात आले.
त्यांना कर्तृत्ववान महिला’ म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि शिक्षण संचालक त्यांचे अभिनंदन केले.
कोरोना विषाणूच्या प्रभावांमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रिंट सन्मानपत्र घरपोच पाठविण्यात येईल तसेच सर्व सहभागी महिलांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र व्हाट्सऍप नंबरवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक ध्येयच्या संपादक मंडळाच्या वतीने कळविण्यात आली आहे.
राज्यातील कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्राप्त यादी पुढीप्रमाणे आहे – https://shikshakdhyey.com/
नवनवीन शैक्षणिक आपडेट्स मोबाईलवर मिळवण्यासाठी बाजूची लाल रंगाची बेल प्रेस करा.Allow वर क्लिक करा आणि मिळवा ब्रेकिंग नोटिफिकेशन.