Site icon ज्ञानसंवाद

बहुवर्ग अध्यापनाचे डिजिटल मॉडेल

अनुदानित आश्रमशाळा मोहपाडा,ता.सुरगाणा जि.नाशिक येथील नाविन्यपूर्ण उपक्रम

नाशिक:-गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना महामारीमुळे त्रस्त आहोत. याचा दुष्परिणाम अनेक क्षेत्रावर झाला.शिक्षण क्षेत्रही याला अपवाद नाही तसेच शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कमी संख्येत नववी दहावीचे वर्ग सुरू ठेवण्यास सांगितले.यामध्ये सामाजिक अंतर राखून वर्ग सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. आमच्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता नववी व दहावीची एकूण पटसंख्या 118 इतकी आहे. त्यासाठी चार ते पाच वर्गखोल्यांची आवश्यकता असणार होती. आणि शिक्षकांना एखादा घटक शिकविताना तो घटक एक वर्गात शिकवल्यानंतर, दुसऱ्या वर्गात तोच घटक पुन्हा शिकवावा लागत होता. परंतु दोन्ही घटक त्याच पद्धतीने शिकविणे वेळ व श्रम ही जास्त खर्च होत होते. यावर उपाय म्हणून आम्ही अनेक वर्गांना एकाच वेळी कसे अध्यापन करता येईल? यावर आम्ही माध्यमिक शिक्षक श्री.चंदर कवर,श्री.संतोष जाधव श्री.दीपक अहिरे, श्री.सुनील कासार व इतर सर्व शिक्षक कर्मचारी आणि माननीय मुख्याध्यापक श्री गवळी सर व श्री दळवी सर यांच्याशी चर्चा करून झूम मीटिंग च्या साह्याने एका वर्गात शिक्षक अध्यापन करत असताना ट्रायपॉड च्या साह्याने मोबाईल अध्यापन करत असलेल्या शिक्षकाच्या समोर धरला व लिंक शेअरिंग करून इतर चार वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या सहाय्याने ती मीटिंग जॉईंट करून तेच अध्यापन इतर विद्यार्थ्यांना ही करता आले. आणि याच पद्धतीने ते शिक्षक एकाच वर्गात अध्यापन न करता पुढील तासिकेला दुसऱ्या वर्गात जाऊन तिथून अध्यापनाचे प्रोजेक्शन इतर वर्गात केले. यामुळे शिक्षकाचा वेळ आणि श्रम या दोन्ही गोष्टींचे बचत झाली. आणि विद्यार्थ्यांनाही एक नावीन्यपूर्ण गोष्ट शिकल्याचा आनंद झाला. आणि कोरोना सारख्या साथरोगावर उपाय म्हणून सामाजिक अंतर देखील राखले गेले. त्यात शाळा निवासी असल्याने आश्रमिय व बहिस्थ विद्यार्थ्यांना वेगळे बसवून अध्यापन दर्जा देखील तोच राखता आला. आजच्या तंत्रज्ञान युगात आपण शिक्षक म्हणून या साध्या कृती व योजना तयार करून या मोठ्या संकटात सुद्धा अडचणीवर मात करून ज्ञान दानाचे पवित्र कार्य सुरू ठेऊ आणि आश्रमशाळा आदर्श करण्याचा ध्यास बाळगू.

शब्दांकन-श्री.वाजे एन.सी.(प्राथमिक शिक्षक, आश्रमशाळा मोहपाडा,सुरगाणा) सोबत लिंक—

</

नवनवीन शैक्षणिक आपडेट्स मोबाईलवर मिळवण्यासाठी बाजूची लाल रंगाची बेल प्रेस करा.Allow वर क्लिक करा आणि मिळवा ब्रेकिंग नोटिफिकेशन.

Exit mobile version