Site icon ज्ञानसंवाद

अदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा होणार ‘सोलर आश्रमशाळा’.

पथदर्शी योजना म्हणुन सोलर आश्रम शाळेची निर्मिती करणे.

रवींद्र कळंभे,पेण:-आश्रमशाळांमध्ये होणाऱ्या खंडित विद्युत पुरवठा व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांपासुन विद्यार्थ्यांची सुटका करणे. on grid व Hybrid net metering पद्धतीचा वापर करून आश्रमशाळेकरिता येणाऱ्या विद्युत देयकाच्या खर्चात बचत करणे याकरीता विशेष केंद्रिय सहाय्य अंतर्गत सन २०१५-१६ करीता मंजुर निधी रु.५००.०० लक्ष रुपये या योजनेसाठी खर्च होणारी अंदाजित रक्कम निश्चित केली आहे.अशी वित्तीय तरतूद करण्यात आली आहे.

पथदर्शी योजना असल्याने राज्यातील अदिवासी विकास विभागातील निवडक शासकिय आश्रमशाळेंची निवड करण्यात येणार आहे.या निवडीसाठी तज्ञ समिती सनियंत्रण करणार आहे.या समितीत आयुक्त, अदिवासी विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित प्रकल्प अधिकारी व महाऊर्जा (मेडा ) आणि इतर यांचा समावेश असणार आहे.
योजनेच्या अनुषंगाने महाऊर्जा (मेडा) संस्था अमलबजावणी यंत्रणा म्हणून कामकाज करेल.

या योजनेद्वारे सौर ऊर्जेवर विविध सुविधा उपलब्ध झाल्यामुळे खंडीत विज पुरवठयामुळे निर्माण होणा-या समस्यांतुन विद्यार्थ्यांची सुटका होईल.
पर्यावरण पुरक / अपारंपरीक / पुर्णनिर्मितीक्षम उर्जा चा वापर वाढेल त्यामुळे प्रदुषण मुक्त वातावरण निर्मीती होईल.
सोलर आश्रम शाळा निर्माण करताना on grid व Hybrid net metering पद्धतीचा वापर करण्यात करुन त्यामुळे आश्रमशाळेकरिता येणाऱ्या विद्युत देयकाच्या खर्चात बचत होईल.

योजनेसंदर्भात सविस्तर माहितीसाठी खालील शासन निर्णयाचे अवलोकन करावे-

नवनवीन शैक्षणिक आपडेट्स साठी आमच्या fb पेज ला लाईक करा- https://www.facebook.com/DnyanSanvad-105728171462266/

नवनवीन शैक्षणिक आपडेट्स मोबाईलवर मिळवण्यासाठी बाजूची लाल रंगाची बेल प्रेस करा.व मिळवा ब्रेकिंग नोटिफिकेशन.

Exit mobile version