Site icon ज्ञानसंवाद

या तारखेपासुन सुरु होणार राज्यातील इयत्ता 5 वी ते 8 वी चे निवासी आश्रमशाळेचे वर्ग.


(
तनवीर जहागिरदार)नाशिक:राज्यातील इयत्ता 5 वी त 8 वी चे निवासी आश्रमशाळा अध्याप बंद आहेत.ते सुरु करावे किंवा कसे याबाबत आदिवासी विकास विभागाने सर्व अपरआयुक्त व प्रकल्प अधिकारी यांचेकडुन अभिप्राय मागविण्यात आले होते.सदर अभिप्रायाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असुन शासन स्तरांवर 15 किंवा 22 फेब्रुवारी 2021 पासुन निवासी आश्रमशाळा सुरु करण्याबाबतच्या हालचाली सुरु असल्याचे विश्वसनिय सुत्रांकडुन माहिती मिळाली आहे.
राज्यात आदिवासी विकास विभागाच्या 498 शासकिय व 1228 अनुदानित आश्रमशाळा आहेत. इयत्ता 9 वी ते 10 वीचे आश्रमीय वर्ग शालेय शिक्षण विभागप्रमाणेच 4 जानेवारीपासुन सुरु आहेत. इयत्ता पाचवी ते आठवी चे निवासी जवळपास दोन लाख विदयार्थी आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. कोव्हीड 19 च्या पार्श्वभुमीवर गेल्या दहा महिन्यांपासुन अनलॉक लर्निग सुरु आहे.शालेय शिक्षण विभागाने इयत्ता 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरु केले आहेत परंतु आश्रमशाळेत निवास भोजन या सुविधा असल्याने त्याबाबत विभागाने स्प्ष्ट दिशानिर्देश दिले नसल्याने जवळपास दोन लाख विदयार्थी वर्गाबाहेरच शिकत होते..आता मात्र आश्रमशाळा निवासी सुरु होणार असल्याने विदयार्थी पुन्हा शाळेच्या वसतीगृहात वर्गात दाखल होतील.

https://dnyansanvad.com/archives/1312

 

नवनवीन शैक्षणिक आपडेट्स साठी आमच्या fb पेज ला लाईक कराhttps://www.facebook.com/DnyanSanvad-105728171462266/

Exit mobile version