मनपा शिक्षिका कुंदा बच्छाव लिखित “गोष्ट एका विमानवारीची, सत्यात उतरलेल्या स्वप्नांची “पुस्तकाचे प्रकाशन सोहळा
नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 18 आनंदवल्ली येथील विद्यार्थ्यांची फेब्रुवारी 2020 मध्ये विमानप्रवास असलेली मुंबई दर्शन सहल गेली होती. समाज सहभागातून काढलेल्या व शाळेचे मुख्याध्यापक श्री कैलास ठाकरे, शिक्षक अमित शिंदे, कुंदा बच्छाव ,वैशाली भामरे व आनंदवली शाळेतील सर्व शिक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळे या शाळेतील 25 विद्यार्थी असलेली ही विमान प्रवासाची सहल यशस्वीपणे पार पडली.
नाशिक मनपात विमानप्रवास असलेली सहल काढणारी आनंदवल्ली शाळा ही पहिली शाळा होती.या सहलीत आपल्याला व आपल्या विद्यार्थ्यांना आलेले सुंदर व अविस्मरणीय असे अनुभव शब्दबद्ध करून त्याला पुस्तक रूप देण्याचे कार्य शाळेतील शिक्षिका श्रीमती कुंदा बच्छाव यांनी केले. त्यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन 72 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 26 जानेवारी 2021 या दिवशी राजीव गांधी भवन,नाशिक येथे मा. आयुक्त श्री कैलास जाधव व मा. महापौर श्री सतीश नाना कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
मा. भीकुबाई बागुल (उपमहापौर)
मा. अर्चना तांबे (उपायुक्त, समाजकल्याण)
मा. गणेश गिते (सभापती, स्थायी समिती),
मा. सुरेश खाडे (अतिरिक्त उपायुक्त),
मा. संगीता गायकवाड (सभापती,शिक्षण समिती,नाशिक)
मा. शाहीन मिर्झा (उपसभापती)
मा.सुनीता धनगर (प्रशासनाधिकारी,मनपा शिक्षण विभाग )
मा. संतोषभाऊ गायकवाड (नगरसेवक प्रभाग क्र.8, आनंदवली) उपस्थित होते.
नाशिक चे जिल्हाधिकारी मा.सुरज मांढरे यांनी या पुस्तकाचे वाचन करून आनंदवली शाळेच्या व श्रीम. बच्छाव यांच्या विमानवारीच्या या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
आनंदवली शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद अशी बाब असून शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या या अविस्मरणीय ,आनंददायी अशा आठवणी पुस्तकरूपाने जतन करून ठेवल्या याबद्दल शिक्षण क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
नवनवीन शैक्षणिक आपडेट्स साठी आमच्या fb पेज ला लाईक करा– https://www.facebook.com/DnyanSanvad-105728171462266