Site icon ज्ञानसंवाद

शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा मुंढेगाव येथे ‘स्वच्छतेचे महत्त्व’ निबंध स्पर्धेचे आयोजन

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;

दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळा मुंढेगाव येथे गांधी तीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धे अंतर्गत ‘स्वच्छतेचे महत्त्व’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधातून स्वच्छतेचे महत्त्व, आणि अस्वच्छतेचे परिणाम यावर आपले विचार मांडले.विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.

स्पर्धेचे निकाल: (मोठा गट)

प्रथम क्रमांक: चेतन गोकुळ हिलिम (वर्ग ७ वा)

द्वितीय क्रमांक: जयेश युवराज घोरपडे ( वर्ग ९ वी)

तृतीय क्रमांक: दर्शन भरत गायकवाड (वर्ग ८ वी )

स्पर्धेच्या आयोजनात माध्यमिक शिक्षक दत्तात्रय पोटे यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली यावेळी मुख्याध्यापक तनवीर जहागीरदार, नितीन केवटे,अनिता घायवटे, रुपाली अहिरे,कमला चंद,शीतल पवार,आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version